तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजाभवानी मंदिरात प्रथेनुसार दीप अमावास्येनिमित्त तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते दीप पूजन करण्यात आले.

 तत्पूर्वी दिवे घासून धूऊन स्वच्छ करण्यात आले होते. आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून साजरी करण्यात येत असून या निमित्त दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. तुळजाभवानी मंदिरात सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दीप पूजन करण्यात आले. या वेळी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील मुख्य दिव्यासह अग्नी झाडाचे महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते दत्त मंदिरासमोर पूजन करण्यात आले. यावेळी महंतांनी आरती करून दीप पूजन केले.


 
Top