येरमाळा/ प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराजावर अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल असतानाच दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलाऊन घेत महीलेच्या अंगास झोंबाझोंबी करीत महीलेचा विनयभंग केला. विशेष म्हणजे यानंतर महाराजाने सदर पीडित महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापुर येथील एकनाथ महाराज लोमटे विरुध्द येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवार दि.२९ जुलैच्या पहाटे १ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, .२८ रोजी गुरूवार असल्याने मलकापुर येथील श्रीक्षेञ दत्त मंदीर संस्थान (मठ) चे ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे यांच्या दर्शनसाठी  परळी येथील ३५ वर्षीय महीला मठातील दर्शन मडपामध्ये बसली असता महाराजांनी महिलेस खोलीमध्ये (रुम) बोलाऊन घेत महीलेच्या अंगास झोंबाझोब करीत महीलाचा  विनयभंग केल्याची घटना गुरवार दि.२८रोजी दुपारी.२ ते २:३०वाजेच्या सुमारास घडली यावेळी महीलेने प्रतीकार करताच महीलेस मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली.सदरील प्रकार घडताच मंदीर परीसरामध्ये प्रंचड गोंधळ उडाला पण महाराजांनी सर्वञ शांतता करत मंदीररातुन पळ काढला. शुक्रवारच्या मध्यराञी १वाजेच्या सुमारास येरमाळा पोलीस ठाण्यात पीडीत महीलेच्या फिर्यादीवरुन   ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे विरुध्द गुंन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top