उमरगा/ प्रतिनिधी-

 येथील बस स्थानकात सर्वत्र खड्डे पडले आहेत प्रवेश द्वारातून बस आत मध्ये जाताना व बाहेर येताना मोठ्या खड्ड्यातुन बस बाहेर काढावी लागत आहे.त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

उमरगा  येथील बसस्थानक हे तालुक्यातील दळणवळनाचे महत्वाचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील तालुका म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणार दुवा आहे.या ठिकाणी असलेल्या बस डेपोला चांगले इन्कम असून ही इतर सोइ सुविधा मिळत नसल्याने प्रवाशी वर्गातून ओरड केली जात आहे. नादुरुस्त बस, पावसाळ्यात गळक्या गाड्या, रस्त्यावर बंद पडणाऱ्या गाड्या या मुळे प्रवाशांना प्रवास करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मागील दोन तीन दिवसांपासून सतत धार पावसामुळे बस स्थानकात सर्वत्र खड्डे पडले आहेत या खड्यात साचलेल्या पाण्याने चालकांना खड्याचा अंदाज येत नाही आणि वाहन चालकांना मोठा झोला बसत आहे त्यातच बसमध्ये बसलेल्या प्रवाशाला दुखापत होतात.बस स्थानकातील प्रवेशद्वारा जवळ पडलेल्या खड्यामुळे बस खड्यात गेल्यास रोड वर येत बसची खालची बाजू घासत असल्याने अनेक वेळा बस बंद पडत आहेत त्यामुळे बस स्थानकात ट्रॅफिक जाम चा अनेकवेळा अनुभव आला आहे. शहरातील वाढलेली गर्दी आणि बस मार्गस्थ करीत असताना रस्त्यातील खड्या मुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.बस स्थानका जवळ असलेल्या रिक्षा स्टॉप मधील रिक्षा चालकांना रस्त्यात पडलेल्या खड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

परिवहन प्रशासनाने या कडे लक्ष देऊन हे खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत अशी मागणी जोर धरत आहे.

 
Top