उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांच्या हस्ते  इयत्ता  दहावी परीक्षेत विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे उपस्थित होते. दिग्विजय राजेंद्रकुमार जाधव (98.60), जिया अनुपकुमार सिरसाट (90.83) या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्रकुमार जाधव, सुभेदार अनुपकुमार सिरसाट, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, बापू गायकवाड, शितल वाघमारे आदी उपस्थित होते. 


 
Top