उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसींना आरक्षण मिळाल्याबद्दल उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबींसी समाजाच्या वतीने पेढे वाटून, गुलाल उधळून, फटाके फोडून, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी ओबीसी समाजाचा विजय असो,अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या आनंदोत्सवात पांडूरंग लाटे, महादेव माळी, इंद्रजीत देवकते, लक्ष्मण माने, नितीन शेरखाने, रवी कोरे-आळणीकर, धनंजय राऊत, सोमनाथ गुरव, सतिश काकडे, नेताजी धोंगडे, शिवानंद कथले, वैभव हंचाटे, मुकेश नायगांवकर, अक्षय ढोंबळे आदींसह ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला होता. 

 
Top