उस्मानाबाद / प्रतिनिधी-
केंद्र सरकारच्या दबावामुळे तीन दिवस खा.राहूल गांधी , खा. सोनिया गांधी यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावून त्रास देण्याचा प्रयत्न करत केला जात आहे . खा . सोनिया गांधी यांनी ही ईडीला वेळोवळी सहकार्य केले आहे . परंतू या प्रकरणात काहीही नसताना नाहक त्रास दिला जात आहे. याचा जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने जाहिर निषेध करून सत्याग्रह आंदोलन करून जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व केंद्र शासनाल, राज्य शासनाला व राष्ट्रपतीना निवेदन पाठिवण्यात आले.
येणाऱ्या काळात हे प्रकरण थांबविले नाही तर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस च्या वतीने रस्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन अशा प्रकारे तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा ईशारा यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी यावेळी दिला आहे.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, सरचिटणीस जावेद काझी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापुरकर, सरचिटणीस शिलाताई उंबरे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, राज्य प्रवक्ते हनुमंत पवार, ओबीसी विभागाचे प्रदेश सदस्य धनंजय राऊत, अशोक बनसोडे, मानवाधिकार विभागाचे अध्यक्ष प्रभाकर लोंढे, महादेव पेठे, शहर उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, संतोष पेठे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस स्वप्नील शिंगाडे, सलमान शेख, भारत काटे, सांस्कृतिक विभागाचे प्रेम सपकाळ, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड, सेवा दल शहराध्यक्ष अतुल चव्हाण, अविदाबाई चव्हाण, माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष शैलेश देव, बाबासाहेब कसबे, आकाश चव्हाण, हज्जू शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.