उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रविवार ३१ जुलै रोजी उस्मानाबाद शहरात राष्ट्रीय कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्यिक, पत्रकार तथा गीतकार अशी ओळख राहीलेल्या प्रतिभासंपन्न कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मसापच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने कवयित्रीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यातील मराठी कवयित्री यावेळी सहभागी होणार आहे 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रीय कवयित्रीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने हा महत्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील  सहभाग : अनुजा जोशी, जयश्री हरी जोशी, वृषाली किन्हाळकर, सुचिता खल्लाळ, कल्पना दुधाळ, कविता मुरुमकर, योगिनी सातारकर पांडे, सुप्रिया आवारे, योजना यादव, भाग्यश्री केसकर, कविता शिर्के, शरयू आसोलकर, मनीषा पोतदार, सुनीता गुंजाळ कवडे, आदी कवयित्रींना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय कवयित्री संमेलनाच्या अध्यक्ष संजीवनी तडेगावकर राहणार आहेत.

उस्मानाबादसह परिसरातील रसिक श्रोत्यांनी या कवयित्रीसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सागर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, जिल्हाध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कार्यवाह बालाजी तांबे यांनी केले आहे.


 
Top