नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय अप्पाराव बेडगे यांची तर व्हा. चेअरमनपदी सय्यद ताजोद्दीन तय्यबअली यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास आघाडी पॅनेलने १३ पैकी १० जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला होता. या विजयामुळे पहिल्यांदा ही सोसायटी अशोक जगदाळे यांच्या ताब्यात आली आहे. निवडुन आलेल्या संचालकांनी चेअरमन व व्हा.चेअरमन निवडण्याचे संपुर्ण अधिकार अशोक जगदाळे यांना दिले होते.

  दि.१ जुलै रोजी निवडणुक अधिकारी श्री पी. आर. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीचे चेअरमन व व्हा.चेअरमन निवडण्यासाठी नळदुर्ग येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सोसायटीचे चेअरमन म्हणुन संजय अप्पाराव बेडगे यांची तर व्हा. चेअरमन म्हणुन सय्यद ताजोद्दीन तय्यबअली यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे संचालक सुधाकर चव्हाण, शाहुराज पाटील, रघुनाथ नागणे, सुहास पाटील, मदन तिवारी, महादेव बिराजदार, उमाबाई जाधव, लक्ष्मीबाई बनसोडे यांच्यासह माजी नगरसेवक नितीन कासार, कमलाकर चव्हाण, ऍड. अरविंद बेडगे, शरद बागल, शाम कनकधर,किशोर बनसोडे, अमित शेंडगे, सुजित बिराजदार यांच्यासह जगदाळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 चेअरमन, व्हा. चेअरमनच्या निवडीनंतर जगदाळे समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.   नुतन चेअरमन संजय बेडगे व व्हा. चेअरमन ताजोद्दीन सय्यद यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top