तुळजापूर / प्रतिनिधी- 

बंडखोरांना येत्या निवडणुकीत शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील,असे प्रतिपादन खा. ओमराजे निंबाळकर यांनी  तुळजापूर तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सेना, यांच्या  गुरुवार दि. ७रोजी आयोजित बैठकीमध्ये   केले

या बैठकीत तालुक्यातील शिवसेना उध्दव ठाकरेचा पाठीशी असल्याचे दिसुन आले. याबैठकीच्या अध्यक्षस्थानी सेनेचे   जिल्हाध्यक्ष तथा आ. कैलास पाटील हे होते. पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले की, अनेक प्रकारची प्रलोभने असताना आमदार श्री. कैलास पाटील हे माझ्यासोबत खंबीरपणे उध्दवसाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले याचा मला व आपल्या जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांना अभिमान आहे.  येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपालिका यांच निवडणुका डोळ्यासमोर असून त्या निवडणुकीत देखील शिवसेना आपल्या सर्वांच्या साक्षीने भरघोस यश मिळवून देईल व जिल्ह्यात यापुढे शिवसेनेची ताकत आपण वाढवू त्यासाठी तुम्हा सर्वांची सहकाऱ्यांची अपेक्षा देखील आहे. शिवसैनिकाने आपल्या कामाच्या माध्यमातुन 50 मतदारांची जोडणी आणि बांधणी करुन पुन्हा नव्याने पक्षबांधणीस सुरुवात करावी, असे आवाहन खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

 याप्रसंगी  शाम पवार, श्रीमती शामलताई वडणे,   सुधीर कदम, राजामत पठाण,  कमलाकर चव्हाण,  संजय भोसले,  आमीर शेख,   काशीनाथ भोरे,  प्रतिक रोचकरी,  संतोष पुदाले, सोमनाथ गुड्डे,  सुनिल जाधव, रोहित चव्हाण,  चेतन बंडगर,  अर्जुन आप्पा साळुंके,   सागर इंगळे,  अमोल गवळी, शाम माळी,   सुनिल कदम, बालाजी पांचाळ,  दत्ताप्पा बंडगर,   दिनेश बंडगर,   सरदार सिंग ठाकुर,   बाळासाहेब शिंदे,  बापूसाहेब नाईकवाडी,  अमोल घोटकर,  सिद्रामाप्पा कारभारी,  विकास सुरवसे,   नितीन ढेकणे,  अंकुश नवगिरे,   महादेव पवार,  रविंद्र दळवे,   अनिल भोपळे,  शंकर गव्हाणे,   जितेंद्र माने,   सौदागर जाधव,   बबन भोसले,  विकास भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top