उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील समता वसाहतीतील श्री दत्त मंदिरात आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येस कलाविष्कार अकादमी उस्मानाबाद आयोजित भजन स्पर्धा २०२२ संपन्न झाली. 

प्रथम विठ्ठल मुर्तीस  मान्यवरांच्या हस्ते बुका टिळा पुष्पहार अर्पण करून भजन स्पर्धेस सादरीकरणास सुरुवात करण्यात आली. यात स्टार प्रवाह होणार मी सुपर स्टार आवाज कुणाचा महाराष्ट्रा चा फेम कु. शर्वरी डोंगरे लातूर हिच्या अंभग गायनाने स्पर्धेस सुरुवात झाली त्यानंतर उस्मानाबाद शहर व तुळजापूर याठिकाणाहून एकूण ११ भजनी मंडळ सहभाग नोंदविला होता. 

प्रास्ताविकात कलाविष्कार अकादमी अध्यक्ष युवराज नळे यांनी आगामी काळात भव्य अश्या भजन स्पर्धा आयोजनाचा मानस असुन अध्यात्माची समाजास गरज आहे असे प्रतिपादन केले . भजन स्पर्धेचे परिक्षण पं. दिपक लिंगे यांनी केले स्पर्धेचा निकालानंतर बक्षीस पात्र भजनी मंडळास प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह, पंढरी वारी पुस्तक देऊन अध्यक्ष क.आ.युवराज नळे ,जेष्ठ नागरिक नायगावकर, सचिव क.आ. शेषनाथ वाघ , अंबादास दानवे, शेषाद्री डांगे , सुरेश शेळके, ॲड देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आले . स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहन मुंडे, राजाभाऊ कारंडे, अविनाश मुंडे , यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर व शेषनाथ वाघ यांनी केले तर आभार हणमंत पडवळ यांनी मानले .

 
Top