उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कुन्हाळी, (ता. उमरगा ) येथील बबलू अर्जुन भोसले उर्फ सुरज, वय 30 वर्षे हे मालाविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने मुरुम येथे अवैधरित्या तलवार हातात घेउन फिरत असल्याची गोपनीय खबर मुरुम पो.ठा. च्या पथकास मिळाली. यावर मुरुम पो.ठा. च्या सपोनि- श्री. जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 20.15 वा. सु. बबलु भोसले यांस मुरुम येथील दर्शन चायनिज सेंटरसमोरुन ताब्यात घेउन तलवार जप्त केली आहे. यावरुन मुरुम पो.ठा. चे पोलीस अंमलदार- मारुती मडोळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत मुरुम पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top