उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे समन्वयक मा.यशवंत शितोळे बोलत होते. विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता असते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. यासाठी करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आय.ए.एस.आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला हे दोन उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन करिअर घडवावे असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

 या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ.मारुती अभिमान लोंढे, डी.बी.टी. स्टार कॉलेज चे समन्वयक डॉ.संदीप देशमुख, एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. माधव उगिले, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. नितीन पडवळ आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top