तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले .यावेळी या यशस्वी खेळाडूंची उस्मानाबाद , अमरावती , मुंबई आदी ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने या यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे दिनांक २५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय ज्युनिअर अॅथलेटिक्स तथा मैदानी स्पर्धेत तेर ता उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील आशा चामे , अजय गलांडे , जय सलगर , रोशनी देवकुळे , पिंपळे पुजा , सुप्रिया साळुंके , सुप्रिया चौगुले , सृष्टी बगाडे , अक्षरा रसाळ , कावळे रोहिणी , वैष्णवी माने , जय कदम , श्रीनिवास हेगडकर , दिक्षा पवार , सिद्धेश्वर ठोंबरे , रेहान तांबोळी , यश भोसले , सौरभ लोमटे , श्रावण आंधळे , हर्षल लोमटे , यश लोमटे , आदि खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी उस्मानाबाद , अमरावती , मुंबई आदि ठिकाणी आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संत विद्यालयातील १८ खेळाडूंची निवड झाली. यावेळी या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचे मार्गदर्शन लाभले .यावेळी मुख्याध्यापक जे. के. बेदरे यांच्या हस्ते सर्व यशस्वी खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एस. एस. बळवंतराव , एम. एन. शितोळे , आर. एम .देवकते , महादेव भंडारे , जयसिंग बोराडे , ए .बीी. वाघेरे , एस. यु .गोडगे , एस. टी .गांगुर्डे , एस. टी .कोळी , ए. बी. नितळीकर , एम. एल. कांबळे , एल.  चव्हाण , के. एस. सय्यद ,  श्रीमती ए. एन .रणदिवे , एम. डी .नरसिंगे , एस .बी. पाटील , प्रा सुर्यकांत खटिंग , सतिश भालेराव , एस .आर .पाटील , शितल सामते , श्रीमती झालटे , एस. डी .घाडगे , विलास वाघमोडे , अरुण सोनटक्के , रत्नप्रभा साखरे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

 
Top