तुळजापूर /प्रतिनिधी

 तालुक्यातील माळुंब्रा येथे अपघातात मयत झालेल्या नर जातीचा वानर हा हनुमानाचे प्रतिरुप असल्याने येथील भजनी मंडाळाने विधीवत  हिंदू रितीरीवाजा नुसार बुधवार दि.२७रोजी सांयकाळी शेतात  अंत्यसंस्कार करण्यात केले.

या बाबतीत अधिक माहीतीअशी की,  माळुंब्रा ( ता. तुळजापूर) जवळील तुळजापूर -सोलापूर महामार्ग रस्ता दहा ते बारा वानर बुधवार दि २७रोजी दुपारी ३.३०वा ओलांडत असताना त्यातील नर जातीचे एक वानर अज्ञात वाहनाचा धडकेत ठार झाले हा अपघात घडताच भाजपा कीसान मोर्चा   तालुकाध्यक्ष गजानन वडणे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व वनपरिक्षेञ आधिकारी बोलवुन घेतले त्यांनी तपासताच ते मयत झाल्याचे निर्दशनास येताच गावातील भजनी मंडळाच्या सत्यवान सुरवसे, साहेबराव वडणे, दाजी गाटे , हरि नावडे,  सतिश आतकरे, श्रीमंत वडणे, कालिदास वडणे , मधुकर गाटे,  नामदेव वडणे यांनी या वानरावर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार केले .यावेळी गावातील स्ञीपुरुष मोठ्या संखेने उपस्थितीत होते.  

 
Top