उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व दत्ता बंडगर यांच्या हस्ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून देशपांडे स्टॅन्ड येथील श्री बालाजी बेकर्स समोर करण्यात आली.

यावेळी युवासेना शहर उपप्रमुख मनोज उंबरे, अमित उंबरे, महेश देवकते, संदीप वाघमोडे, सतीश लोंढे, बबलू राऊत, माजी नगरसेवक गणेश असलेकर, दिनेश बंडगर आदी उपस्थित होते.

हे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान जिल्हा शिवसेना युवासेना व शिवसैनिक दिनेश दत्ता बंडगर यांचे वतीने राबविण्यात येत आहे.द. ३१ जुलैपर्यंत शहरातील देशपांडे स्टॅन्ड येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर चालूराहणार आहे. यावेळी तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, नितीन शेरखान, धारूरचे सरपंच विद्या दिनेश बंडगर, शेकापूर ग्रामपंचायत सदस्य किशोर लागदिवे आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. पहिल्या दिवशी ४७० सदस्यची नोंदणी करण्यात आली. सदस्य नोंदणी अभियानच्या यशस्वितेसाठी आकाश तोडकरी, विजय सोनार, सुधीर अलकुंटे, बालाजी कांबळे, नाना कळसकर, संभाजी इंगळे, शेरू पठाण, रोहित तोडकरी, सुरेश तोडकरी, प्रदीप वाघमोडे, दत्ता गरड, विजय दाडे, आकाश कांबळे, यशवंत कांबळे, अप्पा भोसले यांनी परिश्रम घेतले

 
Top