उमरगा
/ प्रतिनिधी-

 उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे प्रा किरण सगर यांचा विविध मंडळे व संस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रा सगर हे मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असून नुकतीच त्यांची  आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्या प्रित्यर्थ श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी, अभिनव वाचनालय तुरोरी, साहित्य सेवा मंडळ उमरगा, प्रगती ग्रुप तुरोरी यांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन एम माने हे होते.  तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जनता बॅंकेचे संचालक प्रदीप पाटील, अभिनव वाचनालयाचे पदाधिकारी माजी मुअ  श्रीहरी जाधव, उपमुख्याध्यापक  बी एस जाधव, जगन्नाथ माने, नागोराव पाटील,अनिल सगर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अभिजित जाधव, मार्गदर्शक अशोकराव जाधव, सचिव बालाजी माणिकवार, पोलीस पाटील प्रशांत जाधव (पाटील ),  कवी हिराचंद देशमाने यांची उपस्थिती होती.

 प्रा सगर हे  गेल्या अनेक वर्षापासून  वाचक चळवळ, बालसाहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्याचे काम अगदी नेटाने केल्याने मसापच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेवून महामंडळाच्या सदस्यपदी संधी देवून उमरग्यासारख्या सीमेलगतच्या तालुक्याला नवी संधी मिळाली असल्याचे गौरवोद्गार जाधव यांनी काढले. तर सत्काराला उत्तर देताना प्रा किरण सगर यांनी ही नेमणूक म्हणजे तालुक्याचा लौकीक आहे. मी नाममात्र असल्याचे सांगून तालुक्यात विविध साहित्य विषयक उपक्रमाला वेग देण्याचे व नव साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन कवी काशिनाथ बिराजदार यांनी केले तर आभार गुंडू दुधभाते यांनी मानले. कार्यक्रमाला एस टी कांबळे, ज्ञानेश्वर बनसोडे, संदीप कांबळे, कवी दत्ता काजळे यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.


 
Top