उमरगा/ प्रतिनिधी-
येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या अथक प्रयत्नांतून व क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव, सेविका सुनिता राठोड, वनमाला वाले यांच्या मदतीने पाऊण एकर जमिनीवर मियावाकी जंगल साकारले आहे. वीस प्रकारची वेगवेगळी झाडे ठराविक अंतरावर लावण्यात आलेली आहेत. गेल्या दोन वर्षात झाडांची उत्तम जोपासना करण्यात आली आहे.आज मियावाकीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यामुळे प्रशालेतील दिव्यांग भाग्यश्री भोसले व दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या सिमरन शेख च्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, माजी विद्यार्थी गटविकास अधिकारी सुमित जाधव. व्यापारी महासंघाचे सचिव हरिप्रसाद चांडक. प्रा. किरण सगर ,डॉ. यतीराज बिराजदार, सदानंद शिवदे पाटील, प्रभावती जाधव, शितल जावळे केंद्रप्रमुख शीला मुदगडे ,शिक्षण तज्ञ के.डी खंडागळे डॉ प्रमोद बर्मा, बालाजी मस्के उपस्थित होते. जपानी पद्धतीने लावलेल्या मियावतीचा यशस्वी प्रयोग उमरग्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे झालेला आहे . 3 जुलै 2020 रोजी 4500 वृक्षांची लागवड 30 गुंठे जागेवर करण्यात आली होती. झाडे उत्तम पद्धतीने जोपासली गेलेली आहेत मीयावाकी हा प्रयोग जिल्ह्यात एक पायलट प्रोजेक्ट झालेला आहे ,अनेक विभागाचे अधिकारी व पर्यावरण प्रेमी नागरिक मीयावाकी पाहण्यासाठी येत आहेत .झाडांची उंची 15 फुटा पेक्षा जास्त झालेली आहे. मियावाकीमुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळत असल्याने हे एक मोठे ऑक्सिजन हब म्हणून उदयास येत आहे.