तुळजापूर/ प्रतिनिधी-

शिवसेना पक्षप्रमुख   उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख   आदित्य ठाकरे  यांच्या सूचनेनुसार तुळजापूर तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सेना, यांची बैठक उद्या दि. ७ जुलै, २०२२ रोजी,  दुपारी ठीक २.३० वाजता सर्किट हाऊस, तुळजापूर येथे आयोजित केली आहे. या बैठकीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे मार्गदर्शक असून प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार  कैलास घाडगे - पाटील यांची राहणार असल्याची माहिती जिल्हा शिवसेना कार्यालय, धाराशिव यांनी दिली आहे.

 तरी तुळजापूर तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि शिवसेना लोकप्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहणेबाबतचे आवाहन जिल्हा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सेना, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


 
Top