लोहारा/प्रतिनिधी

 दोन दुचाकी मोटारसायकल च्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे घडली आहे. 

याबाबत माहिती अशी की, नाना सुभाष कदम (वय 30 कानेगाव), धीरज महादेव आनंदगावकर (वय 23 भातागळी) असे मयत झालेल्या ची नावे आहेत. तर रविकांत कदम (वय 35 कानेगाव), नितीन जमादार ( वय 26 भातागळी), आकाश भोसले ( वय 21 मातोळा ता.औसा) हे जखमी झाले आहे. दुचाकी मोटार सायकल (क्रं. MH 24 BN 2075 व  MH 20 DM 0695 ) याचा बेंडकाळ जवळ रोडवर  समोरासमोर अपघात झाला. 

या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लोहारा हलविण्यात आले.


 
Top