उमरगा / प्रतिनिधी-

 प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्रस्ताव नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी पहिल्याच दिवशी १९९५ तरुणांनी यामध्ये नोंदणी केली आहे.

जिल्ह्यातील युवकांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. या योजनांच्या माध्यमातून चालू व्यवसाय वृद्धिगत करणे व नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदानासह कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनांची माहिती व इच्छुकांची प्रस्ताव नोंदणी करण्यासाठी २५ ते २९ जुलै दरम्यान ३००० चे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर होणार आहे. प्रस्ताव नोंदणी केलेल्यांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे प्रकल्प अहवाल बनवण्यापासून कर्ज मंजुरीपर्यंत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. युवक-युवतींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी केले. याची सुरुवात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, युवामोर्चा अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, दत्तात्रय सोनटक्के, दत्तात्रय देशमुख, उद्धवराव पाटील, प्रवीण सिरसाठे, पिराजी मंजुळे, आशिष नायकल, बाळासाहेब खांडेकर, प्रदीप वीर, श्रीराम सूर्यवंशी, गणेश पाटील, नीलकंठ पाटील, संदीप इंगळे, सुजित साळुंके, विनोद गरड, दादा पठाण, बालाजी तेरकर, श्रीकांत तेरकर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top