उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

आज कळंब येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना शिंदे गटाची पहिलीच बैठक उस्मानाबाद चे माजी उपनगराध्यक्ष सुरज   साळुंके आणि युवासेना राज्यविस्तारक अविनाश खापे पाटील यांच्या पुढाकारातून पार पडली

या बैठकीत कळंबचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, नगरसेवक अनंत वाघमारे, डिकसळ जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ तोडकर, मुजीब भाई शेतकरी सेना माजी जिल्हाप्रमुख, युवासेना शहर प्रमुख गजानन चोंदे, उपशहर प्रमुख शिवसेना अँड मंदार मुळीक, राहुल हौसलमल, विकी चव्हाण, आडसूळवाडी सरपंच चंद्रसेन अडसूळ, बोरवंटी चे उपसरपंच वैजिनाथ डोंगरे, राहुल मते, विजय बाराते, आप्पा सावंत, दिनेश पवार इत्यादी ग्रामपंचायत सदस्य, अशोक कुरुंद, अजय पारवे, प्रमोद करवलकर तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाहीर उपस्थित होते.

 या बैठकीचे आयोजन युवासेना तालुका समन्वयक ईश्वर शिंदे आणि कॉलेज कक्ष तालुका प्रमुख कृष्णा हुरगट यांनी परिश्रम घेतले. बैठकीनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कळंब नागरपरिषदेतील पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले.


 सत्ता आल्यापासून सर्वसामान्य शिवसैनिकाकडे प्रचंड दुर्लक्ष झालं उलट त्यांना गृहीत धरून काम करण्यात आले खऱ्या अर्थाने लोकनायक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच महाराष्ट्राचे भवितव्य असतील अशी त्यांची कार्यशैली आहे म्हणूनच मोठ्या ताकतीने शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याचे काम आम्ही करू तसेच माजी मंत्री शिवसेना उपनेते यांनीच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचे काम केले आणि इथून पुढे खऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम सावंत साहेब करतील हा विश्वास संपूर्ण जिल्ह्याला आहे - अविनाश खापे पाटील


  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववाचे विचार पुढे नेण्यासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे  आणि जिल्ह्याचे नेते आणि आमदार तानाजी सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आज कळंब येथे शिंदे साहेब समर्थक विचारांचे सर्व शिबसैनिकांची बैठक घेण्यात आली या बैठकीत संघटना बांधणी आणि पुढील राजकीय वाटचाल यावर चर्चा करण्यात आली - सुरज  साळुंके 

 
Top