तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूरला चोरीची गाडी घेवुन आलेल्या तीन खतरनाक कुख्यात तरुण गुन्हेगारांना तुळजापूर पोलिसांनी सापळा रचुन रविवार दि.२४ रोजी  शस्ञासह कमानवेस भागात  पकडले.त्यांच्या कडुन स्कार्फियो गाडी हत्यारे सह 358700रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

यात एक अल्पवयीन आरोपी असल्याचे समजते . या तीन आरोपी विरोधात पुण्यात पंधरा ते सोळा गंभीर गुन्हे असल्याचे समजते यावेळी हे तीन खतरनाक आरोपी पळुन जाण्याच्या तयारीत होते माञ पोलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळे हे आरोपी पळुन जावु शकले नाही.

ही कारवाई पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विठ्ठल चासकर, पि एस आय श्रीमती पवार, रवि भागवत, महेश सावरे, ज्ञानेश्वर माळी, अतुल यादव, ए एस आय रवि शिंदे चालक यांनी केली .

पोना सचिन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादवरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपाससपोनी कांबळे करीत आहेत

 
Top