परंडा/ प्रतिनिधी : -

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांचा 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयामध्ये सोमवार दि.१ रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख  तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी माहिती दिली आहे.

  श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सातारा येथील प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ यशवंत पाटणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ डी आर माने संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये प्राचार्य डॉ अशोक मोहेकर सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद, प्राचार्य डॉ वसंत सानप बलभीम महाविद्यालय बीड, माजी प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे ज्येष्ठ विचारवंत धुळे, प्रा डॉ ए डी जाधव ज्येष्ठ विचारवंत सोलापूर ,प्रा डॉ जयेंद्र लेकुरवाळे राज्य समन्वयक स्पर्धा परीक्षा बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव इत्यादींच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी लिहिलेल्या स्मृतीच्या झरोक्यातून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय -विकासाची वाटचाल, माझा जीवन प्रवास आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व देव देवता  या तीन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे तसेच प्रा डॉ शहाजी चंदनशिवे आणि माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम येथील प्राध्यापिका डॉ शीला स्वामी प्रा डॉ महेशकुमार माने यांनी संपादित केलेल्या यशोदीप गौरव ग्रंथाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच या महाविद्यालयास ( नॅक ) समितीचा अ दर्जा प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.नवनियुक्त प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांचाही स्वागत समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

  या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व प्राचार्य ,सर्व इतिहास प्रेमी, साहित्यिक, पत्रकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव तथा निमंत्रक संजय निंबाळकर यांनी केले आहे.

 
Top