उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून शुक्रवारी(दि.२९) अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. यात २२ कारवाया केल्या. छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मितीचा एक हजार लिटर द्रवपदार्थ जागीच नष्ट करण्यात आला तर २७१ लिटर गावठी दारू, ६५ लिटर शिंदी अंमली द्रव व देशी-विदेशी दारुच्या १८१ बाटल्या जप्त केल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मितीचा द्रवपदार्थ व जप्त दारू ९७ हजार ४२० रुपयांची अाहे. यावरून २२ व्यक्तींविरुद्ध संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले अाहेत.

यात कळंब पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता गायरान पारधी पिढी, ईटकूर येथील सविता संजय काळे ही घरासमोर तर पारधी पिढी मोहा येथील सोजरबाई बालाजी काळे घराच्या बाजूस गावठी दारू निर्मितीचा गुळ-पाणी पदार्थ बाळगल्याचे आढळले. भूम पोलिसांना दोन ठिकाणी छापे टाकले असता यात पारधी पिढी भूम येथील मनिषा तानाजी काळे व  वाकवड ग्रामस्थ रेश्मा राजेंद्र शिंदे ही आपल्या घरासमोर गावठी दारू बाळगल्याचे आढळले. ढोकी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले असता यात राजेशनगर पारधी पिढी ढोकी येथील तोळाबाई बाबासाहेब चव्हाण, पळसप येथील बानुबी सिकंदर शेख गावठी दारू बाळगल्याचे आढळले. तामलवाडी पोलिसांनी सांगवी (काटी) येथे दोन छापे टाकले असता ग्रामस्थ सुरेखा दिलीप सुरते व माधुरी जगदिश शिंदे या दोघी गावठी दारू बाळगल्याचे आढळले. उस्मानाबाद (ग्रा.) पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात सारोळा (बु.) येथील साखरबाई राजेंद्र पवार, अंबेजवळगा येथील नागेश दस्तया गुत्तेदार अंमली द्रव बाळगल्याचे आढळले. मुरुम पोलिसांच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले असता यात कंटेकुर ग्रामस्थ पांडुरंग दयानंद घोटाळे, दाळींब येथील अंबाजी गंगाराम सातपुते, सुपतगावचे विश्वनाथ मारुती सगट गावठी दारु बाळगल्याचे आढळले. अंबी पोलिसांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात शेळगावचे अनिल भगवान कंगले, डोंजा येथील खाजादिन महेबुब पठाण दारु बाळगल्याचे आढळले. लोहारा पोलिसांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात तावशीगडचे बाबु महादु मिटकरी, होळी तांडा येथील संजय त्र्यंबक चव्हाण देशी दारु बाळगल्याचे आढळले. नळुदर्ग पोलिसांच्या पथकास इटकळचे राजेंद्र जगन्नाथ तेलंग अंमली द्रव बाळगल्याचे आढळले. परंडा पोलिसांच्या पथकास वाकडीचे बापुराव गोविंद वळेकर देशी दारू बाळगल्याचे आढळले. येरमाळा पोलिसांच्या पथकास पेंढरी गल्ली, येरमाळा येथील आक्काबाई दिगंबर काळे गावठी दारु बाळगल्याचे आढळले. कारवाई करून संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.


 
Top