उमरगा/ प्रतिनिधी-
उमरगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमरगा शहर पदाधिकाऱ्यांची नगरपरिषद निवडनुक २०२२ संदर्भात जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेशदाजी बिराजदार यांच्या प्रमुख बैठक दि .३ रोजी उमरगा येथे घेण्यात आली.
मागील पाच वर्षात नगरपरिषदेमध्ये झालेल्या जनतेच्या विश्वासघातकी कारभारामुळे शहरातील प्रमुख समस्येकडे दुर्लक्षीतपणा करण्यात आल्याचं सांगत स्वबळावरती लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी करावी काही दिवसामध्ये उमेदवारांची घोषणा करणार आहे . राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदेसारखा होतकरू तरुण पक्षासोबत जोडला गेला असुन याही पुढे अनेक युवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत . शहरात पक्षाची ताकत आणखीन वाढली आहे . त्यांचा फायदा पक्षाला येणाऱ्या निवडनुकीत होणार असुन सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागाची जबाबदारी वाटुन घेऊन कामाला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना प्रा . बिराजदार यांनी दिले .
उमरगा नगरपरिषदेचा मागचा पाच वर्षाचा कालखंड सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार पाहता जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वेगळ्या आपेक्षेने पाहत असल्याचं सांगत दिग्विजय शिंदे यांनी आपली भुमिका मांडली. दाजीसारखा निष्कलंक चारित्र्यवान व्यक्तीमत्व हा पक्षाचा मुख्य आधार असुन त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशे निष्कलंक उमेदवार देण्याचं आवाहन दिग्विजय शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे .यावेळी आमोल पाटील यांनी उपस्थीत सर्व पदधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बालाजी पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उमरगा तालुका अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, शहराध्यक्ष सुशील दळगडे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुका उपाध्यक्ष भैय्या शेख, शंतनु सगर , सरचिटणीस धिरज बेंळंबकर,अनिल व्हंन्ताळकर,प्रताप राठोड,शहर कार्याध्यक्ष फैय्याज पठाण, पिंट कलशेट्टी, लिंगराज स्वामी, बस्वाराज पटणे, राम शिंदे , संजय शिंदे, सागर सोनवने ,अल्लाउद्दीन शेख,साजीद लदाफ,जुल्फीकार काझी, सतीश सुरवसे ,सुरज लदाफ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.