तुळजापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्रात बहुचर्चित बनलेल्या  व महत्त्वपुर्ण अशा तिर्थक्षेञ तुळजापूरच्या नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असुन सध्या तरी भाजपा विरोधात महाविकास आघाडी आशा लढतीचे चिञ दिसुन येत आहे.नगरपरिषद निवडणुक लढविणा-या चाणक्यांनी माञ लढतीचे चिञ गुलदस्त्यात ठेवल्याने पक्ष कि आघाडी पातळीवर ही निवडणुक होणार हे चिञ  अद्या स्पष्ट झाले नाही.

या  निवडणुकीत भाजपा विरुध्द  काँग्रेस ,  शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस  या महाविकासआघाडी  यांच्यात लढत होण्याची  सध्या शक्यता असून लढतीचे चिञ माञ आ. राणाजगजितसिंह पाटील व माजी आ. मधुकर चव्हान यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.  सध्यातरी  तुळजापूर नगरपरिषद  आ. राणाजगजितसिंह पाटील  समर्थकांचा ताब्यात आहे.सध्या केंद्र व राज्यात भाजपा सत्ता असल्याने भाजपा ही निवडणुक पक्ष की आघाडी माध्यमातून लढणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. 


 
Top