उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर  शिक्षकाने वारंवार बलात्कार केला.  या प्रकरणी सदर शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.सदर शिक्षकास न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पीडित मुलगी दहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या मुलीवर शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. तसंच तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले. ही मुलगी स्कुटीवरून प्रवास करत असताना तिला अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. त्यावेळी ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याचं समोर आलं आहे.तिने या प्रकरणानंतर घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी पीडित मुलीने शिक्षकाविरोधात जबाब नोंदवला आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पीडित मुलीचं कुटुंब हादरून गेलं आहे. तसंच विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीती पसरली आहे. कळंब पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

 
Top