कळंब  / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील हनुमान मंदिरात पासून ते मंगरुळ येथील पारधी पेढी पर्यत कळंब कडे जाणाऱ्या रस्त्यावर  मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर शेत तळ्याचे स्वरूप आले असून  जागोजागी चिखल व खड्डया मध्ये पाणी साठून या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.या कडे बांधकाम उपविभागाचे विभागाचे स्पष्ट पणे दुर्लक्ष होत असल्याचे नागरीकांमधुन मत व्यक्त होत आहे. तर याच रस्त्यावर दरवर्षी लखो रुपयांचा निधी खर्च करुन सुद्धा या रस्त्याची दरवर्षी परिस्थिती जैसे थे अशीच होते. सदरील करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे दरवर्षी होत असल्याने नागरिकांमधुन तिव्र संताप व्यक्त होत असुन.जागोजागी खड्डे पडले असुन या खड्डयात सुद्धा पावसाळ्यात पाणी साठत आहे. तर याच मार्गावरुन तालुक्याच्या ठिकाणी खामसवाडी , मंगरुळ व उस्मानाबाद हुन दररोज अनेक वाहने ये-जा करतात परंतु या रस्त्याला खड्डयाचे स्वरुप व तळयाचे स्वरूप आले असून नेमका रस्ता आहे का तळे आहे हे वाहनचालकाला कळून येत नाही. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. तर अनेक दुचाकी चालक या खड्डयात पडुन जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळंब यांनी तात्काळ या रस्त्याचे खड्डे बुजवून घेऊन व रस्त्यावरील साचलेले पावसाचे पाणी साईटला काढुन देऊन रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी नागरीक व वाहन चालकातुन  होत आहे

या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असुन एकही अधिकारी किंवा कर्मचारी या रस्त्याकडे फिरकत नाहीत खामसवाडी गावाजवळ मुख्य पुलाची संरक्षक भिंत गेल्या वर्षी पडली असुन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सुद्धा अद्यापही त्याचे कुठल्याही प्रकारचे काम सुरू झाले नाही. तर मंगरुळ गावाजवळ बाह्य वळणावर शाळेजवळ व पारधी पिढी पर्यंत रस्त्यावर पाणी साठले आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.तरी संबधीत विभागाने तात्काळ पाणी बाजुला काढुन द्यावे, अन्यथा मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल 


 
Top