उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कॅबिनेट मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून आई तुळजाभवानी मातेला साडी, चोळी, खणानारळाने ओटी भरून देवीला भाजप महिला माेर्चाच्या वतीने   साकडे घालण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती की, तुळजापूर तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे करणार. तसेच मागील सरकारच्या काळात देखील पाटील यांनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र प्रशाद योजनेत समावेश करावा म्हणून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला होता. सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गास गती मिळवण्यासाठी, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्यासाठी आणि आई तुळजाभवानी माता ही स्त्री शक्ती स्वरूप असल्याने याठिकाणी महिलांच्या साठी उद्योग निर्मिती करण्यासाठी पाटील यांना कॅबिनेट मंत्रीमंडळात स्थान मिळावे. तसा होण्याचा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या सर्व महिला पदाधिकारी यांना वाटतो असे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चना ताई अंबुरे यांनी सांगितले. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अर्चना ताई अंबुरे, तुळजापूर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ॲड. क्रांती थिटे, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने, जिल्हा सरचिटणीस जोशीला लोमटे, लता पेठे, रंजना पेठे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 
Top