उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उपळे रयत शिक्षण प्रसारक संस्था संचलित हरिभाऊ घोगरे हायस्कूल येथे शुक्रवारी (दि.1 जुलै) रोजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध उपक्रमांसह कृषी दिन साजरा केला.                                      

 यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून निबंध स्पर्धा घेऊन मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कृषी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले वृक्षदिंडी सह वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री अरुण बळवंतराव घोगरे यांच्या सोबत विद्यार्थिनींनी विविध कृषी विषयक गोष्टींवर चर्चा केली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री उजळकर सर त्याचबरोबर पर्यवेक्षक क्षीरसागर सर आदी सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कृषी विद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जे. ई. जहागीरदार, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. व्ही. साबळे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. के. एस. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोनाली मुंडे, सुविरा मलवाडे, चैत्राली जाधव, अनिता जाधव, रक्षंदा रणखांब, प्रतीक्षा घाडगे, प्रियंका हिंगे, पूजा गोंगाने, रूपाली हिप्परकर प्राची कांबळे, शितल कसबे यांनी आयोजित केला.

 
Top