उमरगा/ प्रतिनिधी-

 उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा शहरातील अनेक दानशूर व्यक्तीने विद्यार्थ्यांना अकरा हजार रुपयाची रोख बक्षीसे दिली. 

या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून शकुंतला मोरे तर प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी गटविकास अधिकारी सुमित जाधव. व्यापारी महासंघाचे सचिव हरिप्रसाद चांडक, प्रा. किरण सगर ,डॉ. यतीराज बिराजदार, सदानंद शिवदे पाटील, प्रभावती जाधव, शितल जावळे केंद्रप्रमुख शीला मुदगडे मुख्याध्यापक पद्माकर मोरे शिक्षणतज्ञ के.डी खंडागळे डॉ प्रमोद बर्मा बालाजी मस्के उपस्थित होते. यावेळी शाळेतून प्रथम आलेल्या समरीन शेख या विद्यार्थिनीला 2100 रुपयाचे पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला. द्वितीय आलेल्या वसीम शेख ला पंधराशे रुपये तृतीय आलेल्या प्रियंका शिंदे प्रबुद्ध सरपे अनुराधा माने यांना प्रत्येकी 1100 रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले .यावेळी प्रशालेतील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या 28 विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात विस्तार अधिकारी महाबोले हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख शिला मुदगडे व हरिप्रसाद चांडक यांनी प्रशालेतील दोन विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केलेला आहे. त्यासाठी त्या विद्यार्थिनींना गणवेश, स्कूल बॅग, पुस्तके, वह्या, कंपास इत्यादी सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले, तर डॉ. प्रमोद बर्मा व शीतल जावळे यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला 11000 रुपये देणगी दिली. सोनाली मुसळे यांनी सुद्धा आईच्या स्मरणार्थ 11 हजार रुपये शाळेला दिले. तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे यांनी शाळेसाठी पंधरा हजार रुपयाची देणगी दिली. प्रा. किरण सगर, शितल जावळे, के,डी. खंडागळे, गटविकास अधिकारी सुमित जाधव ,शकुंतला मोरे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे सूत्रसंचालन सरिता उपासे तर आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव ,बशीर शेख, धनराज तेलंग, बलभीम चव्हाण संजय रुपाजी चंद्रशेखर पाटील, सदानंद कुंभार, ममता गायकवाड, सोनाली मुसळे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top