उस्मानाबाद / प्रतिनिधी-

समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू असीम आझमी हे उस्मानाबाद चे धाराशिव नामांतराच्या मुद्यावर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या शुक्रवार दिनांक 23 जुलै 2022 रोजी उस्मानाबाद येथे येत आहेत. त्यानंतर ते   दुपारी 1 वाजता शासकीय विश्राम गृह   पोलीस मुख्यालया समोर पत्रकार परिषदेस संबोधीत करणार आहेत. याबाबत फेसबुक सोशल मीडियावरच्या माध्यमातून पोस्ट करून आजमी यांनी माहिती दिली आहे. 

पत्रकार परिषदेनंतर हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गा येथे दुपारी २ वाजता जिरायत, दुपारी ३ वाजता एस आर फंक्शन हॉल येथे उस्मानाबाद चे धाराशिव नामांतर विरोधी समितीची बैठक घेतील. त्यानंतर ५ वाजता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देतील. त्यानंतर ते रात्री ७ वाजता सोलापूर येथे कार्यकर्ता बैठक घेतील. 

 

 
Top