परंडा /प्रतिनिधी

 परंडा तालुक्यातील भोंजा हवेली व डोमगांव येथील महिला समुहानां कृषी विभाग व आत्मा विभाग अंतर्गत पोषणयुक्त परसबाग बियाणे भाजीपाला किट वितरण करण्यात आले. यामध्ये ११ प्रकार चे बियाणे असून तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रूपनवर व आत्मा विभागाचे तालुका समन्वयक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यात शेंद्रीय पालेभाज्या जास्तीत जास्त आहारामध्ये उपयोगात आणता याव्यात या साठी हे किट वाटप करण्यात येत आहेत.

     यावेळी प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे यांनी भाजीपाला किट मधील बियाणे हे परिसरात परसबागचा आकार देऊन शेंद्रीय पद्धतीने गटातील कुटुंब नियोजन करिता भाजीपाला उभारण्यात यावा. तसेच लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी शासकीय योजना विषयांवर मार्गदर्शन करुन महिलांनी एकत्रीत येऊन शेंद्रीय फळे, पालेभाज्या इ चा उपयोग वाढवणं आवश्यक आहे गटातील कर्जाचे नियमित परतफेड करून शासकीय विविध योजना कर्ज स्वरूपात घेऊन कुटुंबातील उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू ठेवून उद्दिष्ट साध्य करावे तसेच कृषी सहाय्यक भाग्यवंत जी यांनी शेतकरी महिला लाभार्थी यांनी महाडिबीटी योजना चा जास्तीत जास्त लाभ घेवा यावेळी कृषी सहाय्यक भाग्यवंत जी, सदस्य सुनंदाताई पाटील, मा. सदस्य अनुराधा नेटके, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रभाग समन्वयक धनजंय चांदणे, सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी काळे, तुलसी ग्रामसंघ अध्यक्षा अश्विनी नेटके, अध्यक्षा जोत्सना कोळी, सचिव कौशल्या नेटके, लिपीका प्रियंका नेटके, खैरे जी  व गटातील महिला उपस्थित होत्या.

 
Top