उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उमरगा  शहरातील  काळे प्लॉट,  येथील ओंकार सिध्देश्वर बंडगर व दत्ता पुरातले हे दोघ हमीदनगर चौक,   येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी बेकायदेशीररित्या तलवार बाळगलेले तसेच आरडाओरड करुन दहशत निर्माण करुन गोंधळ घालीत असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास मिळुन आले. 

यावर पोलीसांनी ती तलवार जप्त करुन उमरगा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- भागवत घाटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top