तुळजापुर / प्रतिनिधी-

 जुनी इमारत पाडत असताना स्लॅब अंगावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील कमानवेस भागात शुक्रवारी (दि.२२) सकाळी १० च्या सुमारास घडली. यावेळी इतर कामगार वेळीच पळ काढल्याने बचावले. शहरामधील कमानवेस भागात भगवती विहिरी लगत जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू होते.

यावेळी अचानक स्लॅब कोसळल्याने त्या खाली दबून श्रीराम दिनू राठोड (५५,रा. मोतीझरा तांडा) यांचा मृत्यू झाला. यावेळी इतर ८ ते १० कामगारांनी पळ काढल्याने ते बचावले. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रमेश राठोड यांचा माहिती वरून तुळजापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समजताच पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रमेश राठोड यांचा माहिती वरून तुळजापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 
Top