नळदुर्ग / प्रतिनिधी-

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी आषाढ महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी भरणारी आकाडबोन यात्रेत शेकडो भाविकांनी दर्शन घेऊन नवस्फूर्ती केली, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा साधेपणानं साजरी करण्यात आली होती, यंदा मात्र भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. देवीजींना पहाटे अभिषेक ,महाआरती करून दुपारी होमवहानसमोर रूढी परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम पार पाडून यात्रेची सांगता होते, महालक्ष्मीची दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी यात्रा भरते याला “ कायरं  या नावाने ओळखले जाते तर आषाढ महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी भरणाऱ्या यात्रेला आकाडबोन या नावाने ओळखले जाते ,यात्रेमध्ये पर जिल्ह्यासह पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता, यात्रे दिवशी गावातील प्रत्येक कुटुंबातून देवीला दहीभाताचा नेवैद्य दाखवला जातो, दिवसभरामध्ये लहान मुलांची जावळ काढणे, नवीन पोतराजाला दीक्षा देणे, पट बांधणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात   यावेळी आराधी, वाघ्या मुरळी,  जान्या    ,पोतराज यांच्या गीताने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट मंदिर कमिटी, पुजारी मंडळ , ग्रामपंचायत आदींनी पुढाकार घेतला होता, मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे यंदाही मंदिराच्या खड्डेमय रस्त्यावरून धक्के खातच भाविकांसह वाहन चालकाला प्रवास करावा लागल्याचे चित्र दिसून आले. 

 
Top