उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाई - उध्दवराव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विशाल घोगरे तर उपाध्यक्षपदी शशिकांत पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. संचालक पदी बालाजी तांबे, बाळासाहेब नरवडे, रविंद्र शिंदे, अमोल सरवळे, श्रीमती सिंधू कांबळे, श्रीमती ललिता लोमटे,विजयकुमार कुलकर्णी, विलास खरात, उत्तरेश्वर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

संस्थेची बैठक दि. २२ जुलै रोजी संस्थेच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक धनाजी काळे व सहकार अधिकारी बी. एच. सावतर यांच्या उपस्थितीत पार पडली.संस्था सलग ७ वेळा निवडणूक बिनविरोध होऊन एक आदर्श निर्माण केला आहे. संस्थेस महाराष्ट्र शासनाचे सहकारनिष्ठव सहकार भूषण हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. संस्था बिनविरोध करण्यासाठी संस्थापक मार्गदर्शक एम.डी. देशमुख, निवडणूक त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष सुर्यकांत मुंडे, मुख्य प्रवर्तक पी. एन. चव्हाण, निवडणूक समिती सदस्य रामेश्वर चव्हाण, हणमंत  कोळपे, सचिव अमरसिंह     देशमुख यांनी प्रयत्न केले. निवडी नंतर पदाधिकारी व संचालक यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव अमरसिंह देशमुख यांनी तर सुत्रसंचलन संचालक बालाजी तांबे यांनी व उपस्थितांचे आभार संचालक विजयकुमार कुलकर्णी यांनी मानले.

 
Top