तुळजापूर / प्रतिनिधी-

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पैठणचे संतपीठ आणि घनसांगवी येथे विद्यापीठाच्या वतीने चालवले जाणारे मॉडेल कॉलेज या धरतीवर, तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विद्यापीठाकडे सविस्तर प्रस्ताव आल्यास. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाविद्यालय चालविण्यास घेण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

नुकतेच डॉ. प्रमोद येवले सहपरिवार  कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते.दर्शना नंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन आणि प्रसाद देऊन मंदिर संस्थान चे कर्मचारी विश्वास परमेश्वर आणि शिंदे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले,प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर,उस्मानाबाद उपकेंद्राचे व्यवस्थापन विभागाचे संचालक प्रा.डॉ. सुयोग अमृतराव, प्रा.डॉ. विक्रम शिंदे या प्रसंगी उपस्थित होते.

 
Top