उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कारमधून अक्कलकोट रस्त्यावरून नेला जाणारा ४ लाख ९ हजार ५०० रुपयांचा गुटखा मुरूम पोलिसांनी शनिवारी पहाटे पकडला. एपीआय इंगळे, पोलिस अंमलदार होळकर पहाटे गस्तीस असताना अक्कलकोट रस्त्यावरुन जाणारी कार (क्र. एमएच १२ एलडी ५११७) चालक व सहकारी नरसिंह पवार व अनिल नवले (दोघे रा. बीड) यांना कारमधील २६ पोत्यांविषयी विचारपूस केली. त्यात गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची पुडकी आढळली.एफडीएला माहिती दिली. गुन्हा नोंद झाला.


 
Top