परंडा / प्रतिनिधी-

तालुक्यातील सोनगीरी व खासगांव येथील महिला समुहानां कृषी विभाग व आत्मा विभाग अंतर्गत पोषणयुक्त परसबाग भाजीपाला बियाणे मोफत भाजीपाला किट वितरण करण्यात आले यामध्ये ११ प्रकार चे बियाणे असून तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब रूपनवर व आत्मा विभागाचे तालुका समन्वयक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यात शेंद्रीय पालेभाज्या जास्तीत जास्त आहारामध्ये उपयोगात आणता याव्यात या साठी हे किट वाटप करण्यात येत आहेत.          

यावेळी प्रभाग समन्वयक प्रिया पाटील यांनी भाजीपाला किट मधील बियाणे हे भवतालच्या व शेतातील परिसरात परसबागचा आकार देऊन शेंद्रीय पद्धतीने गटातील कुटुंब नियोजन करिता भाजीपाला उभारण्यात यावा. तसेच लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी शासकीय योजना विषयांवर मार्गदर्शन करुन महिलांनी एकत्रीत येऊन शेंद्रीय फळे, पालेभाज्या इ चा उपयोग वाढवणं आवश्यक आहे तसेच प्रभाग समन्वयक समाधान माळी यांनी आभार प्रदर्शन केले असता महिलांनी एकत्रीत येऊन कुटुंबला विषमुक्त शेंद्रीय पालेभाज्या चां दैनंदिन आहारामध्ये जास्तीतजास्त उपयोग करावा यावेळी प्रभाग समन्वयक प्रिया पाटील, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रभाग समन्वयक समाधान माळी, प्रियंका लिमकर, प्रेरिका व गटातील महिला उपस्थित होत्या.

 
Top