उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासन कौशल्‍ विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एंप्लॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in  हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे.

 जिल्हातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ ईच्छिणारे उमेदवार तसेच या पोर्टल वर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्यापपर्यत एप्लॉयमेंट कार्डशी आधार लिंक केलेले नाही, त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी.उमेदवारांना अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02472-299434 किंवा ईमेल आयडी osmanabadrojgar@gmail.com अथवा  asstdiremp.osmanabad@ese.maharashtra.gov.in यावर  संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य ‍विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संजय गुरव यांनी केले आहे.


 
Top