उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राज्यात, विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना विविध सोयी-सुविधा देण्याबाबत तसेच विद्यार्थ्यासाठी भोजन, बेडींग साहीत्य, शैक्षणिक साहीत्य तसेच इतर वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत वस्तू देण्यात येणाऱ्या अनुदानाऐवजी रोख स्वरुपात निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याना 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून वस्तुंचा शासनामार्फत खरेदी करुन पुरवठा करण्यात येऊ नये, अशा लाभाचे वस्तू स्वरुपात अनुदान देण्याऐवजी त्याकरीता विद्यार्थ्याच्या आधार क्रमांक संलग्नीत बँक खात्यामध्ये रोख रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य आणि निर्वाह भत्ता इत्यादीसाठी आवश्यक असलेली रक्कम सदर विद्यार्थ्याचे आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच जिल्हास्तरावरील वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता आणि भोजन इत्यादीसाठी आवश्यक असलेली रक्कम सदर विद्यार्थ्याचे आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
वसतीगृहातील परिस्थिती व्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, स्वच्छता मोहिम, जयंत्या, पुण्यतिथी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रम यशस्वी केले जातात. शासनाने विविध समस्यांचे निर्मुलन करण्याच्या दृष्टीने DBT चा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला आहे. अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतीगृहात www.swayam.mahaonline.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळामार्फत प्रवेश घेण्याकरिता उस्मानाबाद येथील आदिवासी मुलांचे वसतीगृहाचे गृहपाल डी.टी.दिवाणे (9765794404), आदिवासी मुलींचे वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती एस.एम.वेलपुला (9765159530) आणि कळंब येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एल.एम.रचावाड (9764947271) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. तरी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश योजनेचा अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी केले आहे.