परंडा/ प्रतिनिधी-

लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने परंडा तालुक्यातील माणिकनगर, शेळगांव येथील प्रहार संघटनेकडून गरजू १५  लाभार्थ्यांना शेळ्याचे वाटप करण्यात आले. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी १ शेळी अशा १५ शेळ्या मौजे पांढरेवाडी, शेळगाव,माणिकनगर, तांदूळवाडी,सक्करवाडी, भिलारेनगर,ताकमोडवाडी या गावातील  लाभार्थ्यांना शेळ्या वाटप करण्यात आल्या आहेत

या कार्यक्रमास शेळगाव नगरीचे नुतन सरपंच सौ.सुलोचना शेवाळे, विष्णू शेवाळे, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,गट शिक्षणाधिकारी अशोक खुळे, प्रहार जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, राज्यप्रवक्ता दत्तात्रय पुरी, विशाल अंधारे, रघुनाथ दैन,संतुक कडमपल्ले,प्रहार जनता पक्ष तालुकाध्यक्ष नागनाथ नरूटे, आप्पासाहेब तरटे,रणजीत पाटील,अक्षय उदागे,देवकते,विस्तार अधिकारी सतिश संगमनेरकर, शहाजी झगडे, मुख्याध्यापक गुरूदास काळे, केंद्र प्रमुख सुनिल महामुनी,लक्ष्मण औताडे, मनिषा जगताप, ज्योती देशमुख, मनिषा कुलकर्णी, रणजीत नरसिंगे ,सुबराव सुरवसे, तालुकाध्यक्ष विनोद सुरवसे, अमोल अंधारे,तय्यब शेख,अकबर शेख,मोहन शेवाळे, सचिन सुर्यवंशी आदि शिक्षक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैजिनाथ सावंत यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मण औताडे सर यांनी केले.

 
Top