उस्मानाबाद / प्रतिनिधी-

परंडा तालुक्यातील उंडेगाव ग्रामस्थ- अरविंद पांडुरंग शेरे यांच्या घराचे कुलू अज्ञात व्यक्तीने   तोडून घरातील खाताच्या गोणीत गुंडाळून ठेवलेले 10,000  रोख रक्कम चोरुन नेली होती. यावरुन अरविंद शेरे यांनी अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 70/2022 हा भा.दं.सं. कलम- 380, 34 अंतर्गत  नोंदवला आहे. 

गुन्हा तपासादरम्यान अंबी पो.ठा. चे सपोनि-   आशिष खांडेकर, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- सतीष राऊत, सोनटक्के यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे उंडेगाव ग्रामस्थ- सुनील अरविंद शेरे व प्रवीण भक्तीदास शेरे यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीची रक्कम जप्त केली आहे.

 
Top