लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 5 वी तील विद्यार्थी पृथ्वीराज अमोल लोमटे याची चंद्रपूर सैनिकी शाळा व कु.संस्कृती शहाजी जाधव हिची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर साठी निवड झाली आहे. 

सैनिकी शाळेची प्रवेश पूर्व परीक्षा 9 जानेवारी 2022 आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी झाली. त्या परीक्षेच्या निकालामध्ये या दोघांची प्रथम श्रेणीत निवड झाली आहे. या परीक्षेत पृथ्वीराज लोमटे यास 300 पैकी 257 आणि संस्कृती जाधव हिस 100 पैकी 98 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. या दोघांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास भोसले, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, मार्गदर्शक शिक्षक सविता जाधव, हारून हेड्डे, स्कुलचे शिक्षक स्टाफ आणि पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


 
Top