उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील वडगाव (सि.) येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि. २९) दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत सोलापूर – उस्मानाबादसाठी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षण वामन मेश्राम अध्यक्षेखाली विरासत बचाव जनजागृती अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय प्रभारी प्रा. डॉ. विलास खरात मार्गदर्शन करणार आहेत. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील पोलि विभागाचे प्रा. विजय झुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तुषार शिंदे यांनी केले आहे.


 
Top