तुळजापूर / प्रतिनिधी-

 वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियाना अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे महावृक्षलागवड करण्यात आली.

  जिल्हाभर वसंतराव नाईक महावृक्षलागवड दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित आज आलियाबाद येथील भिमाशंकर देवस्थान परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने महावृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, देविदास चव्हाण, शिवाजी चव्हाण, रमेश जाधव, हरिदास राठोड,सिद्राम पवार,व्यकंट राठोड,अरूण चव्हाण, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे‌ आदिजण उपस्थित होते.


 
Top