उमरगा / प्रतिनिधी- 

गुणवत्ता हेच विकासाचे माध्यम असून त्यासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्द व अपार कष्ट घेऊन गुणवत्ता प्राप्त करत ध्येय संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न करावा असे मत परळी येथील शिक्षक तानाजी शास्त्री यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्याव तीने रविवारी (दि.१७) पंचायत समिती सभागृहात  उमरगा-लोहारा तालुक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. डॉ विजय बेडदुर्गे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ विक्रम जिवनगे, डॉ हेमंत श्रीगीरे, माजी सभापती हरीश डावरे, राम गायकवाड, माजी प्राचार्य जी के घोडके, सेवानिवृत्त शाखा अभियंता मोहन दुधभाते, डॉ सतीश दुधभाते, युवराज जोगी, शिवाजी गावडे, जालिंदर सोनटक्के, बालाजी निटूरकर, हरीअंजन हिरकर, कालिंदा घोडके, ज्योती गावडे, लक्ष्मण घुळे, शिवाजी सुरवसे, गुंडू दुधभाते, बाळु परताळे, खंडू दुधभाते उपस्थिती होते. 

यावेळी बोलताना डॉ बेडदुर्गे म्हणाले की, समाजातल्या अनेकांनी विविध क्षेत्रात गुणवत्ते आधारे आपला विकास साधलेला आहे. हिच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी जोमाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्वक मेहनत आवश्यक असून जिवनातील ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी महत्वाची आहे. यावेळी डॉ श्रीगीरे यांचा सामाजिक कार्याबद्दल व डॉ सतीश दुधभाते, सेवानिवृत्त प्राचार्य घोडके, सेवानिवृत्त शाखा अभियंता दुधभाते यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले अविनाश दुधभाते, कृष्णा बनसोडे, राजश्री बनसोडे, वैष्णवी बनसोडे, संकेत दुधभाते, संदीप गाडेकर, स्वाती काळे, महेश घोडके, अक्षय बनसोडे, पार्वती देवकते, अंजली ब्याळे, अंकिता बनसोडे, रुपाली बनसोडे, अंकिता काळे, सुरज बनसोडे, जीवनगे वैष्णवी यांच्यासह पन्नास विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराज गळाकाटे, बालाजी फडताळे,अर्जुन बनसोडे, शिवदास कुलकर्णी, खंडू दुधभाते, तानाजी घोडके, बालाजी घोडके, हनुमंत शिंदे, अजय गडदे, शाहूराज घोडके आदींनी परिश्रम घेतले. शिवराज गळाकाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा संदीप दुधभाते  यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राघवेंद्र गावडे यांनी आभार मानले.


 
Top