उमरगा / प्रतिनिधी- 

 किल्लारी येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या   अंतराष्ट्रीय संस्थेतर्फे जागतीक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .  यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून किल्लारी पोलिस ठाण्याचे पोलिस   निरीक्षक सुनिल गायकवाड सास्तूर निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी नादरगे शतक रक्तदाते श्री भाऊसाहेब आंबेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख श्री सदाशिव साबळे हे उपस्थित होते. यावेळी   सुनिल गायकवाड यांनी देशात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली असून युवकांनी शासकीय नोकरीच्या मागे न लागता प्रथम संस्थेने मोफत कौशल्य विषयक प्रशिक्षण देवून नामाकिंत कंपनीमध्ये रोजगार मिळवून देत आहेत,या संधीचा फायदा घेवून आपले जीवन सफल करावे असे अवाहन केले.

यावेळी   बालाजी नादरगे यानी युवकांनी आपल्या आई वडीलांच्या श्रमाची जाणीव ठेवून कसलीही लाज न बाळगता कौशल्याच्य बळावर रोजगार मिळवून आपल्य बरोबर देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावावा असे सांगून आपल्या भाषणातून युवकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून श्री,सदाशिव साबळे यांनी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील  युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

 प्रारंभी किल्लारी गावातून सुमारे दोनशे विद्यार्थ्यानी जागतीक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून रॅली काढण्यात आली कोन म्हणते रोजगार नाही. कौशल्या शिवाय पर्याय नाही. या घोष वाक्याने परिसर दणानून गेला यावेळी गावातील युवक व ग्रामस्थाकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी भालेराव यांनी केले सुत्रसंचलन दिनेश धुळे यांनी केले वआभार शिलरत्न शेळगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचार्यानी परिश्रम घेतले.


 
Top