उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस मुख्यालयात महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी-अंमलदार अशा 25 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ   पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ सपंन्न झाला.

  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक   नवनीत काँवत  यांनी सेवािनवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सेवानिवृत्त झालेले 2 अधिकारी व 23 पोलीस अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करतांना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले होते. 

 
Top